संदीप कांबळे, कामठी :- दुर्गा देवी नगरातील श्री बाल मुकुंद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कामठी नगर परिषदेचे गटनेते, नगरसेवक तथा माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान आणि नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजाला सुख, समृद्धी लाभावी, शेतीला भरभराट यावी आणि सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा, अशी प्रार्थना केली.





