spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत वाकेश्वर शाळेचे घवघवीत यश

किशोर साहू, मौदा,ता. 10 :- नुकत्याच 7आणि 8 डिसेंबर 2026 ला विभागीय शालेय क्रीडाआणि सांस्कृतिक स्पर्धा मुसेवाडी पं. स. रामटेक जिल्हा – नागपूर येथे पार पडल्या. त्या स्पर्धेत मौदा तालुक्यातील वाकेश्वर या छोट्याशा गावातील जि. प.उच्च प्राथ.शाळेने घवघवीत यश संपादन केले .

या स्पर्धेत कनिष्ठ गट कबड्डी मध्ये मुलींचा प्रथम क्रमांक आला तसेच कुस्ती 24 किलो वजनी गट या प्रकारात कु.आराध्या दिनेश सपाटे हिने प्रथम क्रमांक पटकाविला,त्याचप्रमाणे कनिष्ठ गट लंगडी प्रकारात द्वितीय तर कुस्ती 30 किलो (मुले)या प्रकारात द्वितीय क्रमांक आला. यापुढे हे विद्यार्थी मौदा तालुका आणि रामटेक विभागाचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रतिनित्व करतील. मौदा तालुक्याच्या अगदी टोकावर असलेल्या छोट्याशा गावातील शाळेच्या मुलांची ही प्रगती बघून सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मौदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मरसकोल्हे , केंद्रप्रमुख मोटघरे या गावाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टिकाराम सपाटे तथा सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक मोथरकर , विक्रम आकरे , एम.डी.भोंडे ,कीर्ती परिहार , सी.एस. टेकाम तथा गावातील नागरिक व पालकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

Popular Articles