नागपूर ०७ : सेवासदन हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय परिसरात विठ्ठल वारीचे आयोजन केले.
विठ्ठल वारीच्या निमित्ताने सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रामुख्याने यामध्ये मंगलवेष तथा नऊवारी परिधान करून विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची भूमिका साकारली..
विठ्ठल वारीच्या निमित्ताने सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रामुख्याने यामध्ये मंगलवेष तथा नऊवारी परिधान करून विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची भूमिका साकारली..
वारीच्या माध्यमातून हजारो लाखो लोक एकत्र येऊन उत्साहाच्या वातावरणात ज्याप्रमाणे एकता, समानता, निर्मळता अशा अनेक मूल्यांचे प्रदर्शन करतात ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घोष, टाळ मृदंग, भगवे ध्वज, पर्यावरण संवर्धनाची फलके इत्यादीच्या माध्यमातून वारीचे दृश्य साकारले… संपूर्ण परिसर.. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम…….. पंढरीनाथ महाराज की जय……. अशा जयघोषाने दुमदुमले.. प्रसंगी विद्यार्थ्यांनी संवादातून वारीचे महत्त्व तसेच अभंग गायन केले. शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने वारीत सहभाग घेऊन सामुहिकता, एकता याचे उदाहरण प्रस्तुत केले.