spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून महान गडचिरोली बनवून दाखवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

· लॉयड्सच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

गडचिरोली :- खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीचे आम्हाला शोषण नाही तर दोहन करायचे आहे. शाश्वत विकास हे आमचे लक्ष्य आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून भविष्यात महान गडचिरोली बनवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

लॉईडस अँड मेटल एनर्जी ली. तर्फे बोदली येथे उभारण्यात आलेल्या लॉईडस मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुअल ओराम यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

लॉयड्सने गडचिरोली परिसरात केलेला विकास हा नफा केंद्रित नव्हे तर माणूस केंद्रित असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजाला सोबत घेऊन जेव्हा सर्वसमावेशक विकासाकडे जातो, तेव्हा सोशल प्रॉफिट म्हणजे समाजाचे आशीर्वाद मिळतात. ते काम लॉयड्सच्या माध्यमातून येथे होत आहे. जे कधी काळी नक्षलवादी होते ते आता प्रशिक्षण घेऊन कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. वेगवेगळ्या उद्योगांस लागणारे मनुष्यबळ या केंद्रात तयार होत आहे. पाच वर्षापूर्वी येथे यायला घाबरायचे आज येथील तरुणी विदेशात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत, हा बदल आहे.

येथे येत असलेल्या उद्योगांमुळेl थोडी बहुत झाडे कापावी लागली तरी, वनांचे रक्षण झाले पाहिजे. त्यामुळेच गडचिरोलीत ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प आम्ही केला व त्यापैकी एक कोटी झाडे लावली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हरित गडचिरोली अधिक हरित करण्याचे काम आम्ही करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी केंद्रीय मंत्री ओराम यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक लॉयड्सचे प्रबंध संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अडीच हजार नियुक्ती पत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले..ॲडव्हान्स मिनरल प्रोसेसिंग वर्कशॉप, लॉयडस सेंट्रल किचन, ग्रीवन्स रिड्रेसल पोर्टल या उपक्रमांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला गडचिरोलीचे खा. नामदेव किरपान, आ. धर्मराव बाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोलीतील स्थानिक तरुण आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

उपलब्ध प्रमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम

• तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्ये.* वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, सोलर तंत्रज्ञान, प्लंबिंग, एमईपी आणि दुचाकी वाहन दुरुस्ती.

• बांधकाम आणि सुरक्षा.

बांधकाम, गवंडीकाम, बार बेंडिंग आणि सुरक्षा रक्षक.

• लॉजिस्टिक्स आणि ड्रायव्हिंग.

हलकी व जड वाहने चालविणे, वेअरहाउस असोसिएट, आणि सप्लाय चेन.

• हॉस्पिटॅलिटी आणि डिजिटल कौशल्ये.

हॉटेल मॅनेजमेंट, पाककला, फूड अँड बेव्हरेज, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, पर्यटन आणि मूलभूत डिजिटल कौशल्ये.

• उद्योजकता विकास.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण.

Popular Articles