Related Posts

गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता&semi;कायद्यातील तरतुदींनुसार &OpenCurlyDoubleQuote;हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही&period; त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल&comma; अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल&comma; अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर&comma; अस्लम शेख&comma; अभिमन्यू पवार&comma; रईस शेख&comma; अमीन पटेल यांनी शाळा&comma; महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा&comma; विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता&period; या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात गुटखा बंदी आहे&period;गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे&period; त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे&period; यात नवी मुंबईत 1&comma;144&comma; अहिल्यानगर येथे 185&comma; जालना 90&comma; अकोला 35&comma; नाशिक 131&comma; चंद्रपूर 230&comma; सोलापूर 108&comma; बुलढाणा 664 तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 1&comma;706 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत&period; त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे&period; तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे&period; मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;