मुंबई ०३ : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांमध्ये युती होण्याची चर्चा रंगली असतानाच राणेंनी दोघांवर उपरोधिक भाषेत निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीतील अर्धा भाग देणार का?” असा प्रश्न उपस्थित करत, राणेंनी युतीच्या चर्चांना टोला लगावला. तसेच, “राज आणि उद्धव एकत्र आले तरी जनतेला त्याचा काहीही फरक जाणवणार नाही,” असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे शिवसेनेसोबत गेले, तर उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या मागे पडतील, असा दावा करत राणेंनी स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचारही करणार नाहीत. त्यांच्या मते, ही युती म्हणजे केवळ अफवांची वळवळ आहे.




