spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला मुक्ती दिन साजरा

खापा :- व्ही. एस. पी.एम. अकॅडमी ऑफ हायर एक्जुकेशन नागपुर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी येथे शनिवार दि. ३ जानेवारी २०२५ ला ज्ञानज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस संपूर्ण भारतात महिला मुक्ती दिन व राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.

संस्था अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख, संस्थापक भाउसाहेब भोगे, सचिव डॉ. युवराज‌ चालखोर, पालक संचालक ॲड. चंद्रशेखर बरेठिया यांच्या प्रेरणेतून विद्यालयात महिलांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापिका योगिता बाबाराव बुरहाण यांची त्यांच्या उत्कृष्ठ सेवेकरीता शॉल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून कार्यक्रमाध्यक्ष रिना तिबोले सरपंच कोरमेटा प्रमुख अतिथी दिपा ठाकरे सरपंच नागलवाडी व वंदना देशमुख समाजसेविका (माजी सरपंच) नागलवाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कामगीरी बजावणाऱ्या माता-पालक, गृहिणी, ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, उत्कृष्ठ गृहिणी, तसेच जे विद्यार्थी यशस्वी होवून शासकिय – निमशासकिय सवेत कार्यरत आहेत, अशा चाळीसहून महिलांचा प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षीका बाॅबी पर्बत, पुजा दहिकर, कुंदा बाजनघाटे (शिपाई) तसेच रेखा लोहितकर (पोषण आहार) मदतनिस व मुक्ता करनाके सहाय्यक मदतनिस यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संदिप भोंडे यांनी केले. संचालन प्राध्यापक विजय काळमेघ यांनी केले. शिक्षक रामकृष्णा टेकाडे, दुर्गेश्वर चौधरी, दिपक नारे, ज्ञानेश दळवी, मुरलीधर तवले, मारोती सोमकुवर, शुभम चटकवार यांनी परिश्रम घेतले. सावित्रिबाई फुलेंच्या जिवनावर आधारित नाटिका व नृत्याने मातापालकांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांचे आभार दिनेश हजारे यांनी केले.

Popular Articles