नागपूर :- भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडी, पूर्व नागपूरची या पावन मुहूर्तावर भाजपा वैद्यकीय आघाडी डॉ. विनोद दाढे शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. फार्मासिस्ट डे च्यावतीने, 25 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर, फार्मासिस्टचा सत्कार, वृक्षारोपण मोहीम “एक पेड मां के नाम” व एडवांस आरोग्य तपासणी शिबिर आणि “भाजपा फार्मासिस्ट पदग्रहण समारंभ” आयोजित केलेला होता. यावेळी दोनशेच्या वरून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी श्रीकांत दुबे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद तर्फे धनंजय जोशी, सोनाली पडोळे, हेतल ठक्कर शहर अध्यक्ष, डॉ. हरीश राजगिरे शहर महामंत्री, शैलेश वैरागडे शहर महामंत्री, शैलेश अग्रवाल शहर महामंत्री, मनीष केडिया शहर मंत्री, राजेन्द्र गोतमारे अध्यक्ष वाठोडा मंडळ, डॉ.मनीषा राजगिरे, डॉ.धनंजय येरणे, सुधीर दुबे महामंत्री व पालक, सचिन वानखेडे महामंत्री, दिनकरराव भागडकर यांनी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.




