spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

युवा कॉग्रेस मोर्चातील युवकांचा भारतीय जनता पार्टीत समावेश

नागपूर :- भारतीय जनता युवा मोर्चाचे विश्वसनीय व युवकांचे नवनियुक्त अध्यक्ष झुंझारू नेतृत्व सचिन करारे यांच्या संघटनात्मक युवा जोडणीचा प्रारंभ आज आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे मध्य नागपूरचे सचिव सौरभ चट्टे व पूर्व नागपूरचे युवा काँग्रेसचे कार्यकर्ते यांचा आज भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये प्राथमिक सदस्यत्व स्वीकारून समावेश झाला. सौरभ चट्टे सोबत असणारे असंख्य युवा कार्यकर्ते हे आमदार कृष्ण खोपडे व प्रवीण दटके यांच्या कुशल विकास कामाच्या झपाट्याने व युवकांना आपलंसं करून सोबत काम करण्याच्या भूमिकेने ही सर्व युवा मंडळी एकत्रित झाली व भाजपामध्ये समावेश झाली. अध्यक्ष सचिन कराळे यांनी युवकांना संबोधन करताना म्हटले की, भारतीय जनता युवा मोर्चा तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेला प्राथमिकता देत असते आपण सर्वे युवा एकत्रित होऊन माननीय नरेंद्र मोदी माननीय देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करू व विकासाला गती देण्याकरता कटिबद्ध राहू. आमदार खोपडे यांनी सर्व युवकांचे स्वागत करून सुखदुःखात सहभागी होण्याची हमी देऊन आपण सर्व एक परिवाराचे सभासद आहोत याची ग्वाही दिली. सौरभ चट्टे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, पूर्व नागपूर मध्ये उच्चशिक्षित प्रवक्त्यामुळे वातावरण धुमिळ झालेले आहे. जमिनीवर काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला स्वतःचा जवळीक असल्याकारणाने समोर वाढवण्याचा व तळागाळातील कार्यकर्त्याला डावलण्याचा उपक्रम या प्रवक्तामार्फत सातत्याने होत असतो. अशी प्रवक्ते व यांची विचारधारा युवकांना कधीही आपलंसं करणारी नव्हती या कारणाने मी पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता युवा मोर्चा ची वाट धरली आहे व समोर सर्व युवकां सोबत मिळून संघर्षामध्ये विद्यमान अध्यक्ष सचिन कराळे यांची साथ देऊ याची हमी दिली.

याप्रसंगी पप्पू सोनटक्के अभिषेक भारती, सागर साकुरे, प्रियांका चट्टे, मनोज राखाडे, वैभव मेश्राम, सार्थक केसवानी, अभिनव लोणारे, गौरव कांबळे राजू गुप्ता, अंश केसरवाणी, आशु चट्टे, आकांशा चट्टे, रुपेश गुप्ता, अभिषेक भारती, रुपेश गुप्ता, मिथिल साथनूरकर, रोहित साथनूरकर, आर्यन केशरवानी, आयुश वराडे, सौरभ विश्वकर्मा या सर्वांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.