spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सव

– विश्वविक्रम प्रस्थापित करणार

नागपूर :- युनेस्को ने जागतिक वारसा यादीत समावेश केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 दुर्गाना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘दुर्गोत्सव’ हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या उपक्रमातून शिवछत्रपतींच्या दुर्गाना मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत) संस्थेच्या मार्फत राज्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, त्यांना अगदी जमेल तेथे या वैश्विक ख्याती प्राप्त असलेल्या व युनेस्को ने जागतिक वारसा स्थळाची यादीत समावेश केलेल्या 12 दुर्गांची हुबेहूब प्रतिकृती तयार करावी. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेर दुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड व पद्मदुर्ग किल्ल्याचे समावेश करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांनी घरातील आंगण, गृहसंकुलातील सार्वजनिक जागा, बागेत, बाल्कनीत परिवारातील सदस्यांसोबत वरीलपैकी कोणत्याही एक दुर्गाची उत्तम सजावटीसह प्रतिकृती बनवणे अपेक्षित आहे. तसेच यासोबत सेल्फी काढून पोस्ट करायची आहे. या दुर्गोत्सवात सहभागी होण्याकरिता दि. 12 ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत https://www.durgotsav.com/ या डिजीटल प्लॅटफॉर्मवर नाव व इतर तपशीलाचा फॉर्म भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने आपण बनविलेल्या 12 पैकी एका दुर्गासोबतचे सेल्फी छायाचित्र काढून ते https://www.durgotsav.com/ याच डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करावयाचे आहे. या छायाचित्राची अमृत संस्थेमार्फत वैधता पडताळणी सिध्द झाल्यानंतर भाग घेणा-या प्रत्येकास शासनाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे ‘अभिनंदन पत्र’ डिजीटल स्वरूपात प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘शिवचरित्रातून आज घ्यावयाचे धडे’ या विषयावरील उत्कृष्ट असे ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातील गोष्टीचे संकलनही नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. मनपातर्फे नागपूर शहरातील नागरिकांना या उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Popular Articles