spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण भिलाईतून अटकेत

अमरावती ११ :  माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या छत्तीसगडमधील भिलाई येथील तरुणाला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. शेख इसा शेख मुसा (२८ वर्षे, रा. पथ्रोट, अमरावती जिल्हा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला तसेच त्याचा भाऊ, मेहुणी आणि त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात नवनीत राणा यांना इन्स्टाग्रामवर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी इसा भाई नावाच्या अकाउंटवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तांत्रिक आणि तपास विभागाने या आरोपीला शोधून काढत छत्तीसगडमधील भिलाई येथून अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीव्यतिरिक्त त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावरील अशा धमक्या आणि अश्लीलतेला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

Popular Articles