नागपुर ११ : भारतीय स्वातंत्र्य लढयातील शहीदांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिना प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जुने मॉरीस कॉलेज टी पॉईंट फ्रिडम पार्क (झिरो माईल मेट्रो स्टेशन) जवळील हुतात्मा स्मारकास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.तसेच जागतिक आदिवासी दिना निमित्त गोवारी शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी आर्वीचे आमदार सुमित वानखेडे उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथे आयोजित छोट्याखानी समारंभात मनपाच्या सहायक आयुक्त स्नेहलता कुंभार, नागपूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे रघुवीर देवगडे, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, माजी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अनिल अहिरकर, शुभम वाघ, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, कमलाकर वैरागडे, अर्चना मालोकर, गणेश अजमेरे मधुकर मालोकर मस्के यांच्या सह आदि नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी इतवारी शहीद चौक येथील शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच कॉटन मार्केट शहीद चौक येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. याशिवाय मनपा मुख्यालयातील हुतात्म्यांच्या आणि क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन केले.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मनपातर्फे हुतात्म्यांना अभिवादन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



