spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विक्री करणारे तसेच सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध ०७ गुन्हे नोंद

नागपुर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, विदेशी दारू तसेच वाहन, मोहाफुल दारू असा एकुण ६९,८२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन उमरेड येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन केळवद येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर येथे एकुण ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन बोरी येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे ०१ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०७ गुन्हे नोंद केले आहे.

सदर कारवाईत १६२० मिली देशी दारु, १८०० मिली विदेशी दारू, ३९ लीटर मोहाफुल दारू तसेच वाहन असा एकुण ६९,८२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles