spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१ ताडपत्री बंधाऱ्यामुळे २०० एकर गहू पिकाला एकदा पाणी देण्याची सोय होणार – मयूर दारोडे 

किशोर साहू,मौदा :- राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचनेनुसार कोरड्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी सध्या रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील नाल्यांवर आर्ट ऑफ लिविंग संस्थेतर्फे ताडपत्री बंधारे बनवायला युद्ध पातळीवर सुरुवात झालेली आहे. एक ताडपत्री बंधाऱ्यामुळे दोनशे एकर गहू पिकाला एकदा पाणी देण्याची सोय होणार असल्याचे निसतखेडा येथील आर्ट ऑफ लिविंग चे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मयूर दारोडे यांनी किरणापुर ते दुधाळा रस्त्यादरम्यान नाल्यावरील ताडपत्री बंधाऱ्याचे कामाचे सुपरविजन करीत असताना सांगितले.

दारोडे यांनी पुढे सांगितले की, रामटेक विधानसभा क्षेत्रात एकूण १००० (एक हजार) ताडपत्री बनविण्याचे लक्ष असून आज मंगळवार (ता. 3 नोव्हेंबर) पर्यंत 80 ते 85 ताडपत्री बंधारे बनवून झालेले आहेत.

Popular Articles