spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मध्य भारतात प्रथमच 108 कुंडीय अयुत चंडी महायज्ञ

– भूमिपूजनाचा कार्यक्रम 18 डिसेंबर रोजी, सकाळी 11 वाजता

नागपूर :- कृष्णार्पण सेवा फाऊंडेशन एवं यज्ञ संचालन समिती च्यावतीने आज पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी पंडित नंदकिशोर पांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. मध्य भारतात पहिल्यांदाच सर्वांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सिद्धी 108 कुंडीय आयुत चंडी महायज्ञ आणि देवी भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन 18 जानेवारी ते 27 जनवरी 2026 पर्यंत, मणिव्दीप धाम, चोपडे लॉन, पोलीस लाईन टाकळी येथे ज्वाला माता मंदिरच्या प्रांगणात पोलीस लाईन टाकळी नागपूर येथे श्रध्देय पंडित नंदकिशोर पांडे यांच्या मार्गदर्शनात एवं सानिध्यात संपन्न होणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. मध्य भारतात प्रथमच सिद्धी 108 कुंडी चंडी महायज्ञाच्या भूमिपूजनाचे आयोजन गुरुवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केले आहे. या महायज्ञानात पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य सदानंदजी सरस्वती यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. पत्रकार परिषदेमध्ये मंचावरील पंडित नंदकिशोर पांडे यांनी पत्रकार परिषद संबोधित केली. महायज्ञानाचा मुख्य उद्देश म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या सारख्या महापापांना आणि समाजात घडणाऱ्या अनैतिकसारख्या भयानक गोष्टींना तोंड देण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि सर्व सजीवांच्या कल्याणासाठी या महायज्ञाद्वारे आयुत चंडी महायज्ञ आणि देवी भागवताचे आयोजन केले आहे. त्या दरम्यान सोबत कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष शैलेश पांडे, रमेश चोपडे, किशोर वर्मा, सत्येंद्र तिवारी, कृष्णमूर्ती पांडे, वीरेंद्र धवन, सचिन शर्मा ब्रिजेश मिश्रा आणि उमाशंकर अग्रवाल यांची उपस्थिती होती.

Popular Articles