spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आशिष जयस्वाल प्रयत्नातून गडचिरोली कृषिभवनाला 11 कोटी मंजूर

 

गडचिरोली, २४ : गडचिरोली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यप्रणालीस आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषी भवन उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ११ कोटी ६७ लाख ८ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. कृषी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नातून यासंदर्भात शासन निर्णय २२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.

नवीन कृषी भवनाचे बांधकाम गडचिरोली तालुक्यातील सोनापुर कॉम्प्लेक्स (फळरोपवाटिका प्रांगणात) करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मृद चाचणी प्रयोगशाळा तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र यासाठी स्वतंत्र सुसज्ज सुविधा या इमारतीत असणार आहेत.

बांधकामासाठी निधीचे वितरण:

शासन निर्णयानुसार हे काम २०२५-२६ व २०२६-२७ या दोन आर्थिक वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून दोन्ही वर्षांत प्रत्येकी ५.८४ कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे.

कामाचे तपशील व खर्चाचा ताळेबंद:

या इमारतीसाठी ग्राउंड फ्लोअर, पहिला व दुसरा मजला अशा तीन मजल्यांचे बांधकाम होणार आहे, त्याशिवाय अंतर्गत पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजजोडणी, फर्निचर, ड्रेनेज, अंतर्गत रस्ते आदी कामांचा समावेश आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्च ₹11.67 कोटी आहे.

काम सुरू करण्यासाठी अटी:

काम सुरू करण्यापूर्वी स्थळ विकासाचा स्पष्ट नकाशा, रेखांकन व अंदाजपत्रक, तसेच पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही, संबंधित संस्था व अधिकाऱ्यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासकीय अधिकार व निधी वितरण:

या प्रकल्पाकरिता निधी उपलब्धतेनुसार आर्थिक विभागाचे सहकार्य घेऊन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम पूर्ण होईपर्यंत देखरेख केली जाणार आहे.

Popular Articles