कुही :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक है पथक उमरेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना उमरेड त्यांना गुप्त बातमीदाराने अंमली पदार्थ गांजा बाबत खात्रीशिर माहीती दिली. नमुद पथकाला पेट्रोलींग दरम्यान उमरेड ते नागपुर रोडवर आरोपी आकाश युवराज पंचभाई, वय. ३० वर्षे रा. पिपंळगाव निपानी ता. पवनी जि. भंडारा हा एका लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या बुलेट वर एक काळ्या रंगाच्या मोठी बॅग व आपल्या पाठीला एक मोठी काळ्या रंगाची बॅग लटकवुन वेगाने जातांना दिसुन आला. त्याचे दिशेने पथकाने आपले शासकिय वाहन नेले असता त्याने वेगाने आपल्या मोटार सायकलने पळ काढला पोलीसांचा संशय बळावल्याने अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने पाचगाव पोलीस चौकीत हजर पोलीस अंमलदारांना त्याबाबत माहीती देवुन त्यांचे मदतीने नमुद आरोपीला कुही फाटा येथे ताब्यात घेतले. पोलीसांनी पंचासमक्ष त्याची आणि कडील २. बंगची शडती घेतली अंमली पदार्थ गांजा मिळुन आला.
नमुद आरोपीच्या ताब्यातुन अंमली पदार्थ गांजा १२.६८ किलोग्रॅम किंमती २,५३,६००/- रुपये विनाकमांकाची बुलेट मोटरसायकल आणि मोबाईल असा एकुण ४,१४,६०० /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ गांजा पुरवाठा करणारा आरोपीबाबत माहीती पोलीसांना प्राप्त झाली असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे.
नमुद प्रकरणी आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन कुही येथे कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) २२.२९ एन.डि.पि.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.