spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूक प्रकरणी गुन्हा

– १०.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळमेश्वर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई कामी पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, काटोल ते नागपूर रोड कळमेश्वर मार्गे महिंद्रा झायलो या वाहनाने अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुची वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील काटोल ते नागपूर रोड कळमेश्वर मार्गावर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान महिंद्रा झायलो वाहन क्रमांक एम एच ४० के आर ०३२४ हे वाहन मिळुन आले. नमुद वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तंबाखू मिळुन आला, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहतूक करणारे वाहन मालक आरोपी क्र. १) नामे अमित राजेंद्र प्रसाद गुप्ता, वय ३४ वर्ष, राहणार त्रिमूर्ती नगर, एनआयटी गार्डन, जवळ नागपूर वाहन चालक २) संतोष मोहन गुप्ता, वय ३४ वर्ष, राहणार त्रिमूर्ती नगर, नागपूर यांना ताब्यात घेवुन वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता महिंद्रा झायलो वाहनामध्ये प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मिळुन आला.

पोलीसांनी पंचासमक्ष १) वेगवेगळया कंपनीचे सुगंधीत तंबाखु वजन ५७८.३ किलोग्रॅम किंमती ३,४८,३४४/- रुपये २) एक महिंद्रा झायलो वाहन क्रमांक एम एच ४० के आर ०३२४ किंमती ७,००,०००/- रुपये ३) ०२ अँड्रॉइड मोबाईल फोन किंमती ४०,०००/-रूपये असा एकूण किंमती १०,८८, ३४४/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.