spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१२५ लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ

यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथे २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:२७ वाजता महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर विशेषतः पारधी समाजातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये पारधी समाजातील १२५ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान नागरिकांना फेरफार नोंदवणे, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरणे, श्रावण बाळ योजनेचे अर्ज स्वीकारणे, तसेच आधार कार्ड व राशन कार्डशी संबंधित विविध कामे करून देण्यात आली.

या शिबिराचे आयोजन व यशस्वी नियोजन मंडळ अधिकारी एम. युसूफ शेख आणि ग्राम महसूल अधिकारी पी. ए. दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराबद्दल आनंदवाडीतील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Popular Articles