किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील गावा- गावातील अनेक मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळ ५,१०,१५ किंवा २० वर्षानंतर नामशेष होतात. मात्र याला चाचेर येथील बाजार चौकातील श्री साईबाबा गणेश उत्सव मंडळ अपवाद आहे. येथील मस्कऱ्या गणपती उत्सवाची परंपरा मागील ४४ वर्षापासून सुरू असून यंदा ४५ व्या वर्षातही कायम आहे. म्हणून या मस्कऱ्या गणपतीला ‘चाचेरचा राजा’ म्हणूनही संबोधले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
गणेश उत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री साईबाबा गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी अश्विन सोमनाथे, मोरेश्वर किरपाण, प्रभाकर दरवई, शुभम गडे,संदीप महादुले, आदित्य किरपाण, अमन जैतवार, मोहित बावणे, दादू बावणे, अशोक ढोंगे, सुरेश नगरे, हिमांशू महादुले, पराग किरपाण, रजत बिसणे, यश सोमनाथे, चेतन नाटकर, आकाश मोहने, आशिष नाटकर, राकेश किरपाण, हिमांशू महादुले, उमेश महादुले निखिल किरपाण सह समस्त ग्रामवासी सहकार्य करीत आहेत.








