spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

व्हीजेएनटी प्रवर्गासाठी विशेष शासकीय व आरोग्य शिबिर संपन्न

यवतमाळ :- दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरखेड तालुक्यातील कारखेड येथे ग्रामपंचायत प्रांगणात व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शासकीय सेवा व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभाग यांनी एकत्र येऊन नागरिकांना एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून दिल्या. शिबिराला मंडळ अधिकारी एम. पी. बिजवे आणि ग्राम महसूल अधिकारी एन. पी. कोत्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन शासकीय योजनांची माहिती दिली.

शिबिरादरम्यान परिसरातील एकूण ९१ लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि उपचार पुरवण्यात आले. विविध शासकीय योजना आणि आरोग्य सेवांचा मिळून एकूण ११४ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील व व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ, कागदपत्रे आणि आरोग्य सुविधा थेट गावातच उपलब्ध करण्यात आले आहे.

Popular Articles