spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू विक्री करणाऱ्या, सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध १३ गुन्हे नोंद

नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ८,९९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. असे एकुण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये १३ गुन्हे दाखल केले आहे.

सदर कारवाईत १२०६० मिली देशी दारू, ३७ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ८,९९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचानामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles