spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध जुगार चालवणाऱ्यांवर/खेळणाऱ्यांवर ०४ गुन्हे नोंद

नागपूर :-  पोलीस स्टेशन नरखेड, बेला, बोरी यांनी अवैधरित्या स‌ट्टापट्टी खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकुन सटट्टापटट्टी साहित्य व रोख रक्क्म असा एकुण १३९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत मौजा निखेडा बस स्टॉप, मौजा केवळराम पिपळा बस स्टॉप येथे आरोपी क्र. १) विजय धनराज टोंगसे, वय ३५ वर्षे, रा. वार्ड क १ नरखेड २) कृष्णा बापुराव बोरकर, वय ५० वर्ष, रा. कनियाडोल पिपळा, तह कळमेश्वर है कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहुन सट्टाप‌ट्टी चालवित असताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातून सट्टापट्टी साहित्य व नगदी ६३०/- रूपये असा एकूण ६४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांचेवर प्रत्येक १ गुन्हा एकुण २ गुन्हे नोंद करण्यात आले.

पोलीस स्टेशन बेला अंतर्गत मौजा सिर्सी चामूडेश्वरी मंदीर, जवळ आरोपी नामे हरीचंद्र देवनारायण सोरते, वय ५९ वर्ष, रा. वार्ड क ०१, सिर्सी, ता. उमरेड, जि. नागपूर हा कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहुन स‌ट्टाप‌ट्टी चालवित असताना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून सट्टापट्टी साहित्य व नगदी १३०/- रूपये असा एकुण १३०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत मौजा बोरखेडी रेल्वे शिवार दाणा पाणी धाव्या जवळ आरोपी नामे फिरोझ शेट्टी झाकणेकर, वय ४३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१, बोरखेडी (रेल्वे) तालुका जिल्हा नागपुर हा कागदावर वरली मटक्याचे आकडे लिहुन सट्टाप‌ट्टी चालवित असतानां मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून सट्टापट्टी साहित्य व नगदी ६२०/- रूपये असा एकुण ६२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद सर्व कारवाईत सटट्टापटट्टी साहित्य व रोख रक्क्म असा एकुण १३९०/-रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये एकुण ०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

Popular Articles