Related Posts

मॅट्रिमोनियल साईटवरून लावला १४ लाखांचा चुना; आयटी इंजिनियर हनी ट्रॅपमध्ये अडकला

<p><strong>अमरावती &colon;-<&sol;strong> मॅट्रिमोनियल साईटवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका तरुणीने अमरावतीतील तिवसा तालुक्यातील एका ३४ वर्षीय आयटी इंजिनियर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क १४ लाख ५१ हजार रुपयांना गंडवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली&period; लग्नाचे आमिष दाखवून आणि विविध कारणांचा बहाणा करत उकळलेल्या या रकमेप्रकरणी तिवसा पोलिसांनी वर्धा येथील संशयित तरुणीविरुद्ध सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>लग्नासह एकत्र राहण्याचे प्रलोभन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार&comma; तिवसा तालुक्यातील राहणारे आणि पेशाने आयटी इंजिनियर असलेले भूषण &lpar;३४&comma; नाव बदलले आहे&rpar; यांची यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात एका मॅट्रिमोनियल साईटवरून मयुरी नामक तरुणीशी ओळख झाली होती&period; ही ओळख पुढे इन्स्टाग्रामवर वाढली&period; चॅटिंगचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्या तरुणीने भूषण यांना लग्नाचे आणि एकत्र राहण्याचे प्रलोभन दाखवले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>१४ लाख ५१ हजार रुपयांचा ऑनलाईन पेमेंट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विश्वास संपादन केल्यानंतर मयुरीने फ्लॅट खरेदीसाठी पेमेंट करायचे आहे&comma; वैयक्तिक आर्थिक अडचणी आहेत आणि गुंतवणुकीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगत भूषण यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली&period; या जाळ्यात पूर्णपणे अडकलेल्या भूषण यांनी १५ जुलै ते २१ ऑक्टोबर या कालावधीत गुगल पे&comma; फोन पे आणि युपीआयच्या माध्यमातून वेळोवेळी तिच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १४ लाख ५१ हजार ४६६ रुपये ऑनलाईन पाठवले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फसवणूक आल्याचे लक्षात आले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>काही दिवसांनंतर भूषण यांना स्वतःलाच पैशाची निकड भासू लागल्याने त्यांनी मयुरीकडे आपले पैसे परत मागितले&period; मात्र&comma; पैसे परत मागताच त्या तरुणीने चालढकल करत प्रतिसाद देणे बंद केले&period; आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने तत्काळ तिवसा पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली&period;<&sol;p>&NewLine;