spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती कार्यक्रम 15 नोव्हेंबर ला

नागपूर :- क्रांतिकारी बिरसा मुंडा आदिवासी कल्याण महासंघाच्या वतीने 15 नोव्हेंबर 2025 रोजी रामदासजी मरसकोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली भगवान बिरसा मुंडा यांची १५० व्या जयंतीनिमित्त टिळक पत्रकार भवन च्या सभागृह येथे 15 नोव्हेंबर शनिवारी 5:30 वाजता. साजरी करण्यात येत आहे. याप्रसंगी विशेष अतिथी सुधाकर कुळमेथे माजी अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित राहणार तर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन इसोकर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नागपूर तसेच विजय पिंटू झलके माजी नगरसेवक किशोर कुमेरिया, डॉ प्रकाश ढगे, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता व विद्या मडावी माजी नगरसेवक नरसाळा तसेच कवी प्रभू राजगडकर डॉ. नीलकांत कुलसुंगे ॲड. नरेश सिडाम डॉ. किशोर सराटे, डॉ. एम जे तोडसाम, विजय कोवे डेप्युटी रजिस्टर आयआयटी पवई मुंबई व इतर सन्माननीय पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी आदिवासी जनतेने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन बिरसा मुंडा आदिवासी कल्याण महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब खुरसंगे यांनी केले आहे.

Popular Articles