किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव व गट ग्रामपंचायत, दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा अंतर्गत ‘सेवासंकल्प अभियान’ निमित्त भव्य स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावातील मुख्य रस्ते, शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला सरपंचा भारती आंबीलढुके, उपसरपंच रविंद्र ढोमणे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, धानला केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबीलकर उपस्थित होते.
पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव चे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांच्या नेतृत्वात शिक्षकवृंद पुष्पा आंबीलढुके, अश्विनी तलमले, दिवाकर देशमुख, प्रीती हटवार, नेहा आंबीलढुके, भगवान हटवार, राजेश रोहाड , सुधीर खंडाईत , सुधीर कांबळे, सुजाता बोधले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबीलढुके,ज्योती आंबीलढुके,पुष्पलता उके, उमेश उके यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा उत्साह व ग्रामस्थांचा सहभाग हे या अभियानाचे वैशिष्ट्य ठरले. “स्वच्छ दहेगाव – सुंदर दहेगाव” चा नारा यावेळी देण्यात आला.







