spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जवाहर विद्यार्थी गृहात नगरसेविका शीला तराळे यांचा सत्कार

– तेली समाजाच्या वतीने सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल

नागपूर :- जवाहर विद्यार्थी गृह, तेली समाज, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शीला दिनेश तराळे यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक, सार्वजनिक तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जवाहर विद्यार्थी गृहातील पदाधिकारी, तेली समाजाचे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, सामाजिक उपक्रम तसेच परिसरातील नागरी समस्यांवरही चर्चा करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना शीला दिनेश तराळे यांनी समाजाने व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. समाजाच्या विकासासाठी शिक्षण, संघटन आणि सामाजिक सहभागाला अधिक बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जवाहर विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये संवाद व एकोपा वाढण्यास मदत होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांनी सौ. शीलाताई तराळे यांना पुढील सामाजिक व सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles