spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरात विविध ठिकाणी १५९ दुर्गादेवी मूर्तींचे शांततेत विसर्जन

नागपूर :- शक्तीचे रुप असलेल्या दुर्गादेवी उत्सवाची सांगता विसर्जनाने झाली असून, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध ठिकाणी उभारलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत १५९ दुर्गादेवींच्या मूर्तींचे विसर्जन झाले आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कृत्रिम तलावांमध्ये क्रेनची व्यवस्था करून विसर्जनासाठी मदत केली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांच्या नेतृत्त्वात मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या सह संबधित झोनचे सहाय्यक आयुक्त यांनी दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

नागपूर महानगरपालिकेने दुर्गादेवी मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील ७ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहे. यात लक्ष्मीनगर झोन सह धंतोली व नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी कृत्रिम तलाव उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गोरेवाडा रिंग रोड, पोलीस लाईन टाकळी, कच्छीविसा व कोराडी येथे कृत्रिम तलाव विसर्जनासाठी उपलब्ध केले आहे.

कृत्रिम तलावांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जनाची माहिती खालीलप्रमाणे.

कृत्रिम तलाव विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या

लक्ष्मीनगर झोन – १७

धंतोली झोन – १५

नेहरूनगर झोन – ३

गोरेवाडा रिंग रोड – ७३

पोलीस लाईन टाकळी – ०

कच्छी विजा – ०

कोराडी कृत्रिम तलाव – ५१

Popular Articles