spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोटात अन्नाचा कण गेला नाही तरी चालेल परंतु डोक्यात आंबेडकरी साहित्य पाहिजे – मोहिनी बारमासे

नागपूर :- रिपब्लिकन विद्यार्थी संघटना नागपूर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम लक्ष्मी नगर चौकात, जगात आपण पाहिले असाल मन्नत, मोक्ष, पाप पुण्य, धन पुत्र प्राप्तीसाठी तिर्थक्षेत्र परंतू नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शाने विज्ञानाची पंढरी दरवर्षी लाखो लोकांच्या साक्षीने भरत असते या परिवर्तनाच्या सोहळ्यात पुजा अर्चना न करता पुस्तकाचे गाठोडे घेऊन हा समाज परतीच्या वाटेवर निघतो हि जगाच्या पाठीवर मोठी क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली अन्नाचा कण पोटात नाही गेला तरी चालेल पण डोक्यात आंबेडकरी साहित्य पाहिजे असे प्रतिपादन किताबे रोशन बारमासे यांनी केले ते आज दिक्षाभुमी येथे आंबेडकरी साहित्य वाटप करतांना बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे, धम्म नायक रवी शेंडे, रिपब्लिकन नेते दिनेश बनसोड, आंरिमो चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, आदेश बागेश्वर, विक्रम भारद्वाज, दिपक उमरे, एड.मिलिंद खोब्रागडे, प्रा. राहुल मून, सुमित बंसोड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुधीर वासनिक, सुधिर मोटघरे, धर्मा बागडे, प्रा. रमेश दुपारे हे होते. याप्रसंगी जगातील विचारवंत साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे, भारतीय संविधान, बौद्ध धम्म, अण्णाभाऊ साठे, यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे वाटप मोफत करण्यात आले. या उपक्रमाला उपासक उपासिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. २५ हजार साहित्याचे वाटप करण्यात आले नागरीकांनी सकाळ पासूनच लांबलचक लाईन लावून ठेवली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपूरी यांनी पुष्पहार अर्पण केले तर नामदेवराव निकोसे यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमाला प्रकाश कांबळे, अँड सुरेश घाटे, सुखदेवराव मेश्राम, हंसराज उरकुडे, संजय मोटघरे, दिनेश पेंशने, गबरूवान, सह बारमासे परिवार उपस्थित होते. असे विजय वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles