नागपूर :- नागपूर महानगरपालिके – ओसीडब्ल्यू तर्फे २१ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते २२ जुलै रोजी पहाटे ०२:०० या वेळेत ओम नगर फीडरचा पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ओम नगर फीडरवर इनलेट वॉल्व्ह आणि फ्लो मीटर बदलीसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. २२ जुलै रोजी नेहमीच्या वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत होईल.
२१ जुलै रोजी पाणीपुरवठा बंद असताना खालील क्षेत्रांमधील (CAs) पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल:
१. नारा सीए क्षेत्र – ओम नगर, आर्य नगर, नारा वस्ती, प्रिती सोसायटी, एकता कॉलनी, आराधना कॉलनी, आदर्श कॉलनी, नूरी कॉलनी, नटराज सोसायटी, अलंकार सोसायटी, साई प्रसाद सोसायटी, तवक्कल सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, शिव कृष्ण धाम सोसायटी, इंडियन सोयसायटी, कोहिनूर सोसायटी, बद्रीनाथ सोसायटी.
२. नारी एक्झिस्ट सीए क्षेत्र – शेंडे नगर, आवळे नगर, सह्योग नगर, रमाई नगर, कपिल नगर, कामगार नगर, नालंदा नगर, केजीएन स्वर्ण नगर, काशी नगर, तक्षशिला नगर, नारी गाव, राजगृह नगर, मयूर नगर, समर्थ नगर, बाबा दीपसिंग नगर, बँक कॉलनी, सन्याल नगर, उत्कर्ष सोसायटी
३. नारा एनआयटी सीए क्षेत्र – पांजरा परिसर, विश्व भारती सोसायटी, शबीना सोसायटी, इरॉस सोसायटी, रिलायन्स सोसायटी, उमंग कॉलेज परिसर, समता नगर, गंगोत्री लॉन
४. जरीपटका सीए – भीम चौक, हडको कॉलनी, नागार्जुन कॉलनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, खुशी नगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सह्योग नगर, मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर, सीएमपीडीआय रोड, इंदिरा नगर, अंगुलीमाल नगर, के.के. नगर, आहुजा नगर, जागृत नगर, नागसेन नगर, कस्तुरबा नगर, बाबा दीपसिंग नगर, नारा घाट परिसर, बाल वसतिगृह
एनएमसी-ओसीडब्ल्यू (NMC-OCW) ने संबंधित क्षेत्रातील नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामादरम्यान सहकार्य करावे. फ्लो मीटर बसवणे हा पाणीपुरवठा देखरेखीची यंत्रणा बळकट करण्याच्या आणि कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्याच्या निरंतर प्रयत्नांचाच एक भाग आहे.
पाणीपुरवठा, बिलिंग सेवा किंवा तक्रारींबाबत माहितीसाठी, ग्राहक एनएमसी-ओसीडब्ल्यू (NMC-OCW) हेल्पलाईन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात किंवा ‘नागपूर जल ग्राहक सेवा’ (Nagpur Jal Grahak Sewa) ॲपचा वापर करू शकतात.




