नागपूर :- एल.ए.डी.अँड आर.पी.कॉलेज फॉर वूमन, शंकरनगर, नागपूर येथील संगीत विभाग आणि इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या ‘अभंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विशेष संवादात्मक (इंटरॲक्टिव्ह) स्वरूपाची असून सहभागी विद्यार्थ्यांना आणि संगीतप्रेमींना महेश काळे यांच्याकडून प्रत्यक्ष अभंग गायनाची कला शिकण्याची संधी मिळणार आहे. ही कार्यशाळा महेश काळे स्कूल ऑफ म्युझिक (MKSM) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून ‘अंकुर सीड्स’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. हि कार्यशाळा शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत, एल.ए.डी. अँड श्रीमती आर.पी.कॉलेज फॉर वूमन, शंकरनगर, नागपूर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे. कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून भारतीय शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, संगीतप्रेमी तसेच ७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व इच्छुकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इच्छुकांनी www.ladcollege.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी.




