spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवघ्या १३ वर्षांच्या तीन क्रीडाप्रेमी मुलांनी उभारली विदर्भातील सर्वात मोठी ‘रॅली रॉयल पिकलबॉल चॅम्पियनशिप 2026

नागपूर :- वय हे केवळ एक आकडा असतो, जिद्द, नियोजन आणि नेतृत्व असेल तर मोठी स्वप्नेही साकार होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण नागपुरातील अवघ्या १३ वर्षांच्या तीन क्रीडाप्रेमी मुलांनी घालून दिले आहे. या तिघांनी पुढाकार घेत ‘रॅली रॉयल पिकलबॉल चॅम्पियनशिप २०२६’ या विदर्भातील सर्वात मोठ्या फ्रँचायझी- आधारित पिकलबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे.

नागपुरातील पिकल को. NIT स्विमिंग पूल येथे १६ ते १९ जुलै दरम्यान सुरू असलेल्या चार दिवसीय स्पर्धेत १० फ्रँचायझी संघ आणि १०० हून अधिक नोंदणीकृत खेळाडू सहभागी झाले असून दररोज दुपारी ४ वाजल्यापासून सामने खेळविले जात आहेत. स्पर्धेत व्यावसायिक खेळाडू, महिला खेळाडू, युवा खेळाडू तसेच राखीव खेळाडूंचा समावेश असून लीग फेरीनंतर अव्वल संघांमध्ये बाद फेरीचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची संकल्पना, नियोजन आणि व्यवस्थापन अवघ्या तेरा वर्षांच्या तीन उत्साही क्रीडाप्रेमी मुलांनी केले आहे. पिकलबॉल या वेगाने लोकप्रिय होत असलेल्या खेळाला व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित खेळाडूंना संधी मिळवून देणे आणि मध्य भारतात या खेळाचा प्रसार करणे हा या तिघांचा प्रमुख उद्देश आहे. त्यांच्या नेतृत्व, नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्यामुळे ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे. ही स्पर्धा ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (AIPA) आणि पिकलबॉल असोसिएशन विदर्भ (PAV) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने स्पर्धेला अधिकृत मान्यता आणि विश्वासार्हता लाभली आहे. स्पर्धेला कॉर्पोरेट क्षेत्रातूनही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कॅलिबर हे Powered By Partner, एस. डी. कन्स्ट्रक्शन्स हे Title Sponsor तर बोथरा अँड बागमार ज्वेलर्स हे Co-Title Sponsor म्हणून सहकार्य करत असून इतर अनेक सहप्रायोजकांनीही स्पर्धेला पाठबळ दिले आहे. स्पर्धेच्या आयोजनामुळे नागपुरात पिकलबॉल बाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाप्रेमी, कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत. एवढ्या लहान वयात इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून या तीन मुलांनी केवळ विदर्भाचाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे, क्रीडा क्षेत्रातून आणि समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.