spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हेडलाईट बंद पडल्याने तिनचाकीचा अपघात

– पत्नीचा मृत्यू, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान :- पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारसारोड वर निलज शिवारात तिनचाकी मालवाहु ई-रिक्षाचा हेडलाईट अचानक बंद पडल्याने झालेल्या अपघातात चालकाची पत्नी गंभीर जख्मी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवुन पत्नीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी चालक पती विरूध्द कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार (दि.१७) जुलै रोजी रात्री अंकित पाटील व त्यांची पत्नी शीतल पाटील हे तिनचा की मालवाहु ई-रिक्षाने कन्हानहुन सालवा येथे जात होते. अंकीत पाटील हा गाडी चालवत होता व त्याच्या बाजुला ड्रायव्हर सिटवर त्याची पत्नी शितल पाटील बसली होती. तारसा रोड ने येसंबा कडे जात असतांना १०. ३० ते १०.४५ वा. च्या दरम्यान सरपंच हॉटेलचे काही अंतर पुढे आणि कारेमारे बिल्डींगचे आधी सदर गाडीचा हेड लाईट अचानक बंद झाला. चालक अंकीत पाटील याने चालत्या गाडी मधे हेड लाईट सुरु करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे गांडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडी रोडच्या डाव्या बाजु ला खाली उतरली त्यामुळे गाडीचे बॅलेन्स जावुन गाडी उजव्या भागावर पलटली. चालकाची पत्नी  शितल पाटील ही डाव्या बाजुला पडली आणि तिच्या अंगावर गाडी पडली. तसेच चालक उजव्या बाजुस पडला.

या अपघातामुळे चालकाची पत्नी शितल पाटील हिला डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच चालकाच्या डोक्याला, पायाला आणि कंमरेला मार लागला. चालक अंकीत पाटील याने त्याच्या पत्नीला उपचार कामी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासुन मृत घोशीत केले. त्यानंतर मृत देह शवविच्छेदना साठी उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलीसांनी पाहणी केली असुन सततच्या पावसामुळे पंचनामा उशिराने करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांच्या फिर्यादीवरून कन्हान पोलिसांनी चालक पती अंकित भारत पाटील रा. सालवा (येसंबा), ता. मौदा, जि. नागपुर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरू केला आहे.

Popular Articles