नागपूर :- एनएमसी-ओसीडब्ल्यूने (किल्ला महाल फीडर) चा २२ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दि. २३ जून २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजेपर्यंत (एकूण १८ तास) शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे. सेवा सदन चौकातील विद्यमान बोरियापुरा ईएसआर (ESR) शाखा फीडरसह ‘अमृत’ फीडरचे ६०० × ४५० मिमी आकाराचे इंटरकनेक्शन (I/C) काम पूर्ण करण्यासाठी हा शटडाऊन आवश्यक आहे.
या शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील:
1. बोरियापुरा/खदान ESR CA –
रेड स्टोन्स, चुना मस्जिद, शारदा माता मंदिर, कोसरकर मोहल्ला, नंद बाजी डोब, चापरे मोहल्ला, खरबीकर मोहल्ला, देवघर मोहल्ला, बाजीराव गल्ली, गोळीबार चौक, हेडाऊ मोहल्ला, कुरडकर मोहल्ला.
2. किल्ला महल CA –
बापू महाजन गल्ली, गजानन महाराज गेट, झेंडा चौक, मातृसेवा संघ संप, किल्ला गेट संप, गायत्री कॉम्प्लेक्स, कल्याणेश्वर मंदिर, उपाध्ये गल्ली, तुळशीबाग रोड, भोसला कॉलनी, अलीखांब, भुतेश्वर नगर, शिवाजी नगर, सांगली रोड, नवापूर रोड, शिवाजी नगर, नागपुर रोड. दसरा रोड, राहतेकर वाडी, गायत्री कॉन्व्हेंट.
या पाणीपुरवठा बंददरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.







