spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यावरणास अपायकारक तसेच जिवितास धोकादायक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध २ गुन्हे नोंद

नरखेड :- नरखेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, इंदीरा नगर, नरखेड येथे करीम मोहम्मद शेख, वय ६२ वर्ष, रा. इंदीरा नगर, नरखेड हा आपले दुकानात प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे नरखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीच्या दुकानाची पंचासमक्ष घरहाडती घेतली असता त्याचे ठेल्यामध्ये एका पांढऱ्या बोरीत नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेला मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून मोनो काईट कंपनीचे एकुण ०४ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती २४००/- रूपये असा एकुण २४००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन नरखेड येथे कलम १२५, २२३ भा.न्या.सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उमरेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, महारानाप्रताप चौक, उमरेड मंगळवारीपेठ, उमरेड येथे साहिल दिगांबर धारने, वय २३ वर्ष, रा. महारानाप्रताप चौक, उमरेड मंगळवारीपेठ हा आपले राहते घरी प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे उमरेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीच्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या पोतली मध्ये नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेला मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून मोनोकाइट फायटर कंपनीचे एकुण ०८ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ४०००/- रूपये असा एकुण ४०००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम १२५, २२३ भा.न्या.सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles