spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर ग्रामीण पोलिसांनी प्रथमच गोवंश जनावराची कत्तलीकरीता तस्करी / वाहतुक करणाऱ्या १२ आरोपींच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अन्वये कारवाई केलेली आहे.

कळमेश्वर :- नामदार देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी घोषणा केली होती की, सतत गोवंशाची वाहतुक करणाऱ्या गुन्हेगारांच्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम MCOCA अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. नागपुर ग्रामीण जिल्हयात मा.  हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांचे मार्गदर्शनात कळमेश्वर पोलीसांनी अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीकामी तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख तसेच सदस्य अशा एकुण १२ आरोपीतांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ लावला आहे. अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तलीकामी तस्करी करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कारवाई करणारा नागपुर ग्रामीण जिल्हा हा शक्यतो महराष्ट्र राज्यातील पहीलाच जिल्हा आहे.

पहाटे कळमेश्वर पोलीसांना डायल ११२ वर माहीती प्राप्त झाली की, फेटरी येथे नागपुर ते काटोल रोडवर एका ट्रकला आग लागली आहे. कळमेश्वर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता एक टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी ५०९४ हा जळतांना दिसला. वाहन चालकाबाबत विचारपुस केली असता चालक घटनास्थळावरून पळुन गेल्याची माहीती प्राप्त झाली पोलीसांनी तात्काळ अग्निशमन दलास बोलावुन आग विझविली, पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश जनावरे दिसुन आली. नमुद जनावरे दोरखंडाने बाधुन निर्दयतेने कोंबुन असल्याचे दिसुन आले. एकुण ३७ जानावरे मिळुन आली पैकी २९ जनावरे मृत पावली होती तसेच ८ गोवंश जनावरांना वाचविण्यात यश आले. जनावरांना राउळगाव येथील जैन गोशाळेत दाखल करण्यात आले. नमुद वाहन चालक आरोपी याने अवैधरित्या जनावरांची वाहतुक करीत असतांना त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालविण्याने वाहनाचा टायर फुटला. टायर फुटल्यानंतर सुध्दा नमुद चालक आरोपी याने दुघर्टना होवु शकते हे माहीती असतांना सुध्दा सदर वाहन न थांबविता चालवित राहील्याने रोडचे आणि टायरचे घर्षण झाल्याने आग लागली. टायर ने पेट घेतल्यानंतर सुध्दा आरोपीने नमुद वाहन महामार्ग क एन एच ३५३ जे वर चालविल्याचे रोड चे सुध्दा नुकसान झाले. वाहनाला लागलेल्या आगी मुळे नजिकच्या वस्त्यामध्ये जिवीत हानी होवु शकते हे आरोपीला माहीती असतांना सुध्दा तो पेटलेला ट्रक सोडुन पळुन गेला. सदर प्ररकणी नमुद आरोपीवर कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे ३२६ (ग), ६१(२), भा. न्या. सं ५(१), (अ) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ११(१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १३४/१७७ मोटर वाहन अधिनियम, ८ (ब) राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, ३ (१) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम ७ फौजदारी सुधारणा कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

Popular Articles