spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रामीण आवास योजनेमध्ये विभागात 2 लक्ष 70 हजार 426 घरकुल पूर्ण

– राज्यात नागपूर विभाग सर्वोत्कृष्ट

– आवास योजनेचे 94.75 टक्के उद्दिष्ट पूर्ण

नागपूर :- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये नागपूर विभागाने 2 लक्ष 70 हजार 426 घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. तसेच या योजनेत विभागाला सर्वोत्कृष्ट दहा पुरस्कार मिळाले आहेत. राज्य पुरस्कृत योजनेमध्येही विभाग राज्यात प्रथम असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली आहे.

महा आवास अभियान 2023-24 मध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा विभाग, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजना जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिले आहे. या योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्यक्रम दिल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भरीव प्रगती झाली आहे.

नागपूर विभागाने महाआवास अभियान 2023-24 या आर्थिक वर्षात विविध सहा घटकांमध्ये एकूण दहा पुरस्कार पटकावले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर विभागाला दोन लाख 85 हजार 49 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख 70 हजार 426 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर 25 हजार 667 घरांच्या बांधकामाची बांधकाम प्रगतीपथावर आहे. या योजनेअंतर्गत विभागाने 94.75 टक्के घरकुल पूर्ण करून राज्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्याने 93 हजार 509 घरकुले पूर्ण केली असून 3000 21 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. म्हणजेच 98.18 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे दुसऱ्या स्थानावर गडचिरोली जिल्हा असून जिल्ह्यात 29 हजार 636 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 4709 घरकुल प्रगतीपथावर आहे जिल्ह्यात 94.40 टक्के घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. भंडारा जिल्हा तृतीय स्थानावर असून जिल्ह्यात 59,673 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले तर 8760 घरकुल प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 94.04 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. नागपूर जिल्ह्यात 329 78 घरकुल पूर्ण झाले असून 2092 घरकुल प्रगतीपथावर आहे जिल्ह्याने 92.16 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वर्धा जिल्ह्यात 16 हजार 394 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 1714 घरकुल प्रगतीपथावर आहे जिल्ह्यात 93.64 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी विक्री यांनी दिली.

सर्वोत्कृष्ट विभागासह सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम पुरस्कार गोंदिया व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये तृतीय पुरस्कार वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये मौदा तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये कारंजा तालुका द्वितीय ठरला आहे, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजना द्वितीय पुरस्कार डोंगरगाव चंद्रपूर व राज्य पुरस्कार योजनेमध्ये प्रथम पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील आजनसरा त्या गावाला मिळाला आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नागपूर विभागाला प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष गौरव केला आहे.

राज्य पुरस्कृत योजनेमध्ये विभागात दिलेल्या उद्दिष्टापैकी 71 हजार 407 घरकुल मागील वर्षी तर यावर्षी 99 हजार 998 घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे तसेच 28 हजार 591 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.

नागपूर विभागाने ग्रामीण आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये राज्यात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक गटविकास अधिकारी यांचे अभिनंदन केले असून पुढील वर्षीही राज्यस्तरावर विभागात सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त  विजय लक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.