– दोन आरोपी अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कन्हान :- टेकाडी बस स्टाप परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक नागपुर ग्रामिण पोलीसांनी २४.२५० कि. ग्रँम अमली पदार्थ (गांजा) रंगेहाथ पकडुन पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन एकुण ५,३४,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
गुरवार (दि.७) जानेवारी ला सायंकाळी ५:४५ वाजता दरम्यान अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक कन्हान उपविभागात नागपुर ते जबलपुर मार्गाने पेट्रोलिंग करित असतांना टेकाडी उडाणपुलाजवळील हनुमान मंदिर बस स्टँड जवळ दोन इसम हातात ट्राॅली बँग घेऊन संशयितरित्या उभे दिसुन आले. हालचाली संशयास्पद वाटत असल्याने पोलीसांनी त्यांच्या जवळ जाऊन विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन उडीसा येथुन चित्रकुट उत्तरप्रदेश येथे जात असल्याचे सांगितले. सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना दिली असता ते फाॅरेन्सिक पथक, कन्हान पोलीस स्टाॅपसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पंचा समक्ष दोन्ही इसमांच्या बँगाची झडती घेतली असता झडतीत २४.२५० किलो ग्रँम अमली पदार्थ (गांजा) मिळुन आला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी १) अमित रामदीन रयकवार वय ३४ वर्ष रा. ग्राम करवी, तहसिल करवी, जिल्हा चित्रकुट, मुळ रा. उत्तरप्रदेश मुसीवाल बांदा, उत्तरप्रदेश, २) अमितेंद्र उर्फ जियु जयकिरणसिंह वय २८ वर्ष दोन्ही रा. एच पी पेट्रोलपंप जवळ यादव डेरा ग्राम पैलानी डेरा, तह सिल पैलानी, जिल्हा बांदा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेऊन २४.२५० किलो ग्रँम अमली पदार्थ (गांजा) किंमत ४,८५,००० रुपये, तीन अँनड्राईड मोबाईल ४५,००० व इतर साहित्य ४,६२० असा एकुण ५,३४, ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकार तर्फे फिर्या़दी दिनेश अजाबराव गाडगे अमली पदार्थ कारवाई पथक यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ८ (क), २० (ब) २ (क), २२, २९ एनडीपीएस अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजितसिंग देवरे, पोउपनि प्रविण भिमटे, पोहवा दिनेश गाडगे, प्रविण देव्हारे, प्रकाश ठोके, अमृत किंगे, नापोशि अमोल नागरे, पोशि तुषार गजभिये, अनिल खरडकेले आदीनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.




