– तब्बल 3500 स्पर्धकांमधून अरहनची टॉप 12 मध्ये निवड
यवतमाळ :- स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन -4 या कार्यक्रमात यवतमाळ येथील अरहन सुबोध वाळके याची निवड झाली असून नुकतेच त्याने एका एपिसोड मध्ये ‘मन उधान वाऱ्याचे गीत’ गाऊन परीक्षकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनी जिंकली आहे,विशेष म्हणजे अरहनचे वय फक्त 10 वर्षे असून एवढ्या कमी वयात त्यांने भरारी घेतल्याने त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
अरहन हा यवतमाळ शहरातील सेंट ॲलोयसियस शाळेतील पाचव्या वर्गात शिकत असून अरहनला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली, अरहनचे वडील सुबोध वाळके हे गेल्या 25 वर्षापासून संगीत क्षेत्रात असून त्यांचे यवतमाळ शहरात जिमी स्टुडिओ नावाने ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे त्यांनी आतापर्यंत आदिवासी गोंडी, मराठी,बंजारा, अशा विविध भाषेत गाणे तयार केले आहेत.

अरहन वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याला संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली, हळूहळू त्याने घरीच गाणे गायला सुरुवात केली, अरहनला संगीतात रुची असल्याने संगीताचे धडे गौरव मानकर व अतुल शिरे या संगीत शिक्षकांकडे घेण्यास सुरुवात केली, हळूहळू गाणे गाऊन त्याने सोशल मीडिया प्रसारित करण्यास सुरुवात केली सोशल मीडियावर अनेकांनी अरहनला पसंती दर्शवली ह्याच माध्यमातून स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमात तब्बल 3500 स्पर्धकांमधून अरहनची निवड झाली व टॉप 12 मध्ये त्याचे सिलेक्शन झाले, नुकतेच मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला त्यात अरहन वाळकेने मन उधान वाऱ्याचे गीत सादर केले,कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर,गायक आदर्श शिंदे व गायिका वैशाली सावंत यांनी अरहन दाद दिली अरहन हा संगीत क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे सांगत आहेत तर त्याने गायलेल्या गाण्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




