spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपुरात २९८ ग्रॅम हेरोइन जप्त, दोघांना अटक

चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली चौक परिसरात मोठी कारवाई करत २९८ ग्रॅम हेरोइन जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून हेरोइन, एक कार, रोकड आणि मोबाईल फोन असा एकूण ३०,१९,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील रस्ते गर्दीने भरलेले असताना आणि पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना, तस्करांनी अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा डाव आखला होता. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेला पडोली परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार, नितीन ऊर्फ छोटू शंकर गोवर्धन हा कारमधून चंद्रपूर शहरात हेरोइन विकण्यासाठी येणार होता. त्यानुसार पडोली चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली असता, त्यात २९८ ग्रॅम हेरोइन/ब्राऊन शुगर आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी छोटू गोवर्धन आणि त्याचा साथीदार साहिल सतीश लांबदूरवार यांना अटक केली. या अंमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास आणखी वेगवान केला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.