कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर जवळ बकरी ईद च्या दिवशी कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेल्या तीन गोवंश जनावरांना पोलिसांनी जीवनदान दिल्याची घटना काल दुपारी चार दरम्यान घडली असून यातील जप्त तीन गोवंश जनावरांना गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून दोन आरोपी नामे सोहेल अहमद अन्सारी वय 25 वर्षे व शेख जावेद युनूस मोहम्मद वय 25 वर्षे दोन्ही राहणार कामगार नगर कामठी विरुद्ध कलम 5,5 (ब),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सह कलम 11(1)11(1)(फ),11(1)(ह)11(1),(आय)प्राण्यांना छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गोहत्या होऊ नये व विशेषतः बकरी ईद च्या दिवशी उत्सवाच्या नावाखाली कुठेही गोहत्या होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन प्रत्येक हालचालीवर नियंत्रण साधून होते त्यातच बकरी ईद च्या दिवशी कामगार नगर जवळ एक गाय व दोन कालवड असे तीन गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना कुठलाही चारा पाणी न देता निर्दयतेने क्रूरतेने बांधून असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश आंधळे,एपीआय सचिन यादव व सहकारी पथकांनी त्वरित घटनास्थळी धाड घालून 45 हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जनावरे ताब्यात घेत त्यांना कामठी येथील गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बकरी ईद च्या दिवशी 3 गोवंश जनावरांची सुटका

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.


