spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला कामात व्यस्त करून 36 हजार रुपये घेऊन पसार

– व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील सत्तू हलवाई चौक परिसरातील अमित जनरल स्टोअर येथे दिनांक 27 मे 2026 रोज मंगळवारला सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास अज्ञात तीन इसमाने व्यापाऱ्यास सामान दाखवण्याचा बहाना करून गल्ल्यामधील 36 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली असून दुकान मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार अमित रामरतन पैगवार वय 47 वर्ष यांच्या मालकीचे सतू हलवाई चौक कामठी येथे अमित जनरल स्टोअर असून दुकानाच्या वर कुटुंबातील सदस्य वास्तव्यास आहेत दिनांक 27 मे 2026 रोज मंगळवार ला सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास पस्तीस वर्षे महिलेसह दोन तरुण व प्लास्टिक खुर्ची विकत घेण्याच्या बहनाने आले दुकानात रामरतन पैगवार वय 60 वर्ष हे उपस्थित असताना महिला व तिच्या मुलाने दुकानाच्या समोर रोडवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या दाखवण्याची मागणी केली दुकान मालक रामरतन पैगवार महिला व महिलेचा मुलगा तिघेही दुकानाच्या बाहेर रोडवर ठेवलेल्या खुर्च्या पहावू लागल्या सदर आरोपी महिलेने दुकानदाराला वेगवेगळ्या खुर्च्या दाखविण्याचा बहाना करून शेजारी असलेला महिलेसोबत आलेला अनोळखी इसम दुकानात शिरला व गल्यात ठेवलेले 36 हजार रुपये घेऊन पसार झाला थोड्याच वेळात महिले महिला व मुलगा त्यांनी कोणतेही सामान्य घेता परत निघून गेले थोड्या वेळात दुकान माली अमित रामरतन पैगवार दुकानात आले व गल्ल्यांमध्ये ठेवलेले 36 हजासर रूपये पाहू लागला असता ते दिसले नाही त्यामुळे त्याला पैसे चोरीला गेल्याची समजून आले त्यांनी त्वरित आरडा ओरड करून इकडे तिकडे पाहू लागले असता दोन मुले व महिला हे तिघेही पसार झाले त्या दिवशी दुकान मालक अमित राम रतन परिवार यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला अज्ञात तीनहि आरोपीनी दुकानातील गल्ल्यातून 36 हजार रुपये लपास केल्याची तक्रार केली केली असता पोलिसांनी कलम 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मीना झाडे करीत आहे ही चोरीची घटना घडली त्याच दरम्यान शुक्रवारी बाजार परिसरात अशाच प्रकारे तीन दुकानातून चोरी झाली असल्याचे अमित रामरतन पैगवार यांनी सांगितले सतत शुक्रवारी बाजार परिसरातच्या चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जुनी कामठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून त्वरित आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे व्यापाराचे शिस्त मंडळ लवकरच राज्याचे महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भेटून कामठी येथे पोलीस बंदोबस्त वाढवून नागरिकांची सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.