कामठी :- भर उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी भरकटलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला कवठा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश डफरे यांनी पकडून जीवदान देण्याची घटना 27 मे 2026 रोज मंगळवार ला सकाळी साडेनऊ वाजता सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार उन्हाळ्यात नवताप्याला सुरुवात झाली असून उन्हाचा परा 44 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे सूर्य आग ओतू लागला असून पाण्याच्या शोधासाठी सर्वत्र हाहा कार मचला असून पाण्यासाठी भरकटलेला राष्ट्रीय पक्षी मोर कवठा परिसरात दिसताच गावठी कुत्र्याचे कळप राष्ट्रीय पक्षी मोराच्या मागे धावू लागल्याने मोर स्वतःचा बचाव करण्याकरिता कवठा येथील सार्वजनिक पाणीटंकी खाली लपवू लागला असता त्याच दरम्यान कवठा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश डफरे, उपसरपंच रवी कुहिटे, नाना इंगळे यांना मोर दिसून येताच त्यांनी गावठी कुत्र्यांच्या कळपाला हाकलून लावले व मोराला जिवंत पकडून ग्रामपंचायत कार्यालयात आणले राष्ट्रीय पक्षी मोराला पाणी पाजून घटनेची माहिती कामठी येथील वन विभागाचे अधिकारी एस गिरी यांनी दिली असता त्यांनी रेस्क्यू पथकाला पाठवून मोराला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालय सेमिनरी हिल नागपूर येथे वन विभागाचे अधिकारी घेऊन गेले मोर पकडल्याची माहिती गावात पसरताच मोराला बघण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती सरपंच निलेश डफरे यांनी गावठी कुत्र्याच्या हल्ल्यातून राष्ट्रपक्षी मोराला जीवदान दिल्याने गावकऱ्यांनी सरपंच निलेश डफरे यांचे अभिनंदन केले.



