spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाघ/बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील 3 बकऱ्या ठार

– हेटिखेडा शिवारातील घटना; पशुपालक व नागरिक भयभीत

खापा :- खापा वनपरिक्षेत्रातील हेटिखेडा शिवारात एका वाघ/बिबट्याने गोठयातून तीन बकऱ्याची शिकार केल्याची घटना दि. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अशा सतत होत असलेल्या जनावरांच्या शिकारीमुळे पशुपालक व शेतकरी भयभीत झाले आहे.

२४ जानेवारीच्या सायंकाळी पेंढरी येथील पशुपालक शेतकरी रविंद्र नारायण काकडे यांनी हेटिखेडा रोडवर असलेल्या त्यांच्या शेतातील गोठ्यात जनावरांचा चारापाणी करुन घरी गेले. सकाळी सहा वाजता गोठ्याकडे गेले असता गोठ्याला मोठे छिद्र पडले दिसले व एकूण जनावरांपैकी ३ बकऱ्या शिकार खाल्ल्यागत अवस्थेत दिसले. इतर जनावरे भयभीत अवस्थेत ओरडतांना दिसले.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी गावातील शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली. खापा वन विभागाचे कर्मचारी महेश कुथे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

हा परिसर जंगलाला लागून असल्याने शिवारात अशा घटना घडत आहे. कुणाच्या बकऱ्या तर कुणाचे वासरू, कुत्रे, व अन्य पाळीव प्राणी अशा होणाऱ्या जनावराच्या शिकारी मुळे येथील पशुपालक शेतकरी त्रस्त व भयभीत झाला आहे.

वन विभागातर्फे होणाऱ्या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे. शेतकरी भीती बाळगून शेतात कार्य करीत आहे. गोपालक रविंद्र काकडे यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी व जंगली हिंसक जनावरांचा कायमचा बंदोबस्त लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.