– विधवा महिलांसाठी अंधश्रद्धा रुढी ही कुठ तरी थांबली पाहिजे ? शालिनी सव्वालाखे
– विधवांचे मनोबल वाढविण्यासाठी समाजसेविका महिलांनी पुढे यावे !
नागपूर :- दक्षिण नागपूरात संजय गांधी नगर येथे जीवन सपंदा जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मोनाली अपर्णा व अध्यक्षा शैल जैमिनी आणि विशेष अतिथी रजनी चव्हाण आणि अंगणवाडी सेविका माया ढाकणे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे २००७ पासून विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यकम राबविण्यात येते. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे महिलाच महिला ना अपमानास्पद वागणूक देऊन, त्यांच्या भावना दुखवून त्यांना धार्मिक विधी कार्यापासून वंचित ठेवल्या जाते. तसेच कुटुंबाच्या परिवारांततीला शुभ कार्यात सहभागी होऊ देत नाही. म्हणूनच मी ठामपणे विचार करून एकोणविस वर्षापासून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. अशा कार्यक्रमाला महिला भरपूर प्रमाणात उपस्थित राहत होत्या पण बदल होत नव्हते पण मी थांबले नाही मी थोडं त्यांना मार्गदर्शन करतांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले.

तेव्हापासून माझ्या कार्याला आजपर्यंत १० % यश आले असे वाटते. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रथम खूप टिका ऐकायला मिळत होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केले व इथंपर्यंत हा वसा राबविण्यासाठी महिला सहभागी झाल्या. कुठे तरी हि अंधश्रद्धा रूढी थांबली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू राहील. असे मनोगत समाजसेविका शालिनी सव्वालाखे यांनी या उपक्रमात महिलांना सांगितले. जीवन सपंदा जेष्ठ नागरिक मंडळाच्या सर्व महिला सभासदांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पाडला. याप्रसंगी संचालन संगिता महल्ले, प्रास्ताविक शालिनी सव्वालाखे यांनी तर आभार प्रतीभा कठाणे यांनी मानले आणि सरते शेवटी वान चहा नाश्ता करून कार्यक्रमाची सांगता झाली.




