spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विनानंबर प्लेट कार चा थरार, कारची फिल्मी स्टाईल मध्ये दुचाकीला धडक, धडकेत दुचाकीस्वार जखमी 

खापा :- सावनेर पारशिवणी राष्ट्रीय महामार्गावरील खापा येथील कन्हान नदीच्या पुलाजवळ शनिवारी (२४ जानेवारी) गंभीर अपघात झाला. विनानंबर प्लेट असलेल्या भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

मात्र, हा केवळ अपघात नसून तो एक ‘ठरवून केलेला घातपात’ असल्याचा संशय बळावला जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष शेषराव निळे (३७, रा. खापा) हे दुचाकी क्रमांक एम एच ४० बी व्ही ०६७० ने रामडोंगरी येथून आपल्या शेतातून खापाकडे येत होते. सिल्व्हर रंगाच्या वोक्सवॅगन व्हेनटो कारने फिल्मी स्टाईल मध्ये त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत आशिष हा रस्त्यावर आदळला. जखमीला तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागरिकांनी घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. घटनास्थळावरून कार चालकाने त्वरीत पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार जप्त केली. कार चालकाचा तपास सुरू असून कार जप्त करून आरटीओ तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय डोंगरे पुढील तपास करीत आहे.

Popular Articles