spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध ३२ प्रकरणं नोंद; उपद्रव पथकाची कारवाई

नागपूर, ता. २५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता.२४)  रोजी शोध पथकाने ३२ प्रकरणांची नोंद करून २४,८00/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून ६,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून १,६००/- रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०९ प्रकरणांची नोंद करून ५,५००/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद  करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले.  उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 1,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत यशवंत मेश्राम व भावेश हेडा यांच्यावर चेंबर ब्लॉक केल्यामुळे प्रत्येकी रू.5,000/- या प्रमाणे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच मोहम्मद अलताफ यांच्यावर रस्त्यालगत अनधिकृतरित्या झोपडे बांधल्याने रू.5,000/- रूपयांचे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे.लिटील मिलिनीयम यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.नेहरूनगर झोन अंतर्गत मे.गीताई रेसिडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.फैजल किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. कलश स्वीटस यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.