spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारूविक्री व सेवनप्रकरणी ४ गुन्हे दाखल

नागपूर :- हर्ष पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री, दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०४ गुन्हे दाखल केले.

पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी नामे अजय विजय नितनवरे, वय ४४ वर्ष, रा. केरडी, ता. पारशिवनी याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी नामे १) जयकपुर छोटेलाल उईके, वय ३० वर्ष, रा. सावलाना ठाणा बाग्यघया ता. परासीया छिंदवाडा म. प्र., ह. मु एनटीपीसी शिवार २) कमलेश इकबाल बाकदे, वय ३० वर्ष, रा. घोघरी, ता. अमरवाडा छिंदवाडा म. प्र. ह. मु. एनटीपीसी शिवार ३) मनोज देवचंद तिरपुडे, वय ४९ वर्ष, रा. लापका रोड, ता. मौदा, जि. नागपूर यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०३ गुन्हे नोंद.

नमुद कारवाईत एकुण १८०० मिली देशी दारू असा एकुण ८००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.

Popular Articles