कन्हान :– कन्हान पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मच्छी मार्केट च्या बाजूला कन्हान न्यु मार्केट येथे अभिषेक यशंवत रोडगे हा काही लोकांकडून पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता मच्छी मार्केटच्या बाजूला कन्हान न्यु मार्केट येथे आरोपी अभिषेक यशंवत रोडगे, वय ३४ वर्ष, रा. नया नगर राणी तलाव कामठी, जि. नागपूर हा कागदावर आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असतांना मिळुन आला. पोलीसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम २१९०/- रूपये, सट्टापट्टीचे लिहण्याकरीता वापरलेले साहित्य असा एकुण २१९५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी अभिषेक यशंवत रोडगे, वय ३४ वर्ष, रा. नया नगर राणी तलाव कामठी, जि. नागपूर याच्या विरूद्ध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








