spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 40 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर, ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार(ता.20)  रोजी शोध पथकाने 40 प्रकरणांची नोंद करून 42,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून 17,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1  प्रकरणाची नोंद  करून रू.1,000/- चे दंड वसुल करण्यात आले. रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत1 प्रकरणी नोंद करून रू.1,000/-दंड वसुल केला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.13,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे.आदित्य वाधवा बिल्डर्स यांनी बांधकामामुळे  मेन चेंबर लाईन तोडल्याने रू.15,000/-दंड वसूल करण्यात आला.नेहरूनगर  झोन अंतर्गत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे  रू.१०,०००/-दंडवसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.शाहु किराणा स्टोर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने  3 प्रकरणांची नोंद करून रू.30,000/- दंड वसूल केला.

Popular Articles